राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल जाधव यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

उंबर्डे पंचक्रोशीतील ४३३ विद्यार्थ्याना दिलं साहित्य..!
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 03, 2023 20:09 PM
views 121  views

वैभववाडी : राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष नासीर रमदुल यांच्या माध्यमातून उंबर्डे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या भागातील ४शाळांमधील ४३३ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहीत्य दिले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने एक उपक्रम राबविण्यात आला.तालुक्यातील उंबर्डे पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालय उंबर्डे, सिताराम विद्यामंदिर शाळा, प्राथमिक उर्दू शाळा मेहबूबनगर, उर्दू हायस्कूल कोळपे उंबर्डे मेहबूबनगर या शाळांमधील एकूण 433 विद्यार्त्यांना शेक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. 

येत्या काळात  जनतेच्या हिताचे उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात येणार आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी यापुढे असच काम करणार अस विशाल जाधव यांनी सांगितले. यावेळी रसूल मुकादम,  उंबर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राठोड, श्री पाटील, नजरुद्दिन जामदा, श्री कांबळे , निजाम बोबडे, यासीन बोबडे, हसन पकाली यासह ग्रामस्थ उपस्थित होते.