
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपा नेते रविंद्र चव्हाण व खासदार नारायण राणे यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार राबवल्या जात असलेला दप्तर व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम नेमळे जि.प.शाळेत पार पडला. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी चिमुकल्यांमध्ये रमत दप्तर आणि शालेय साहित्याचे वाटप चिमुकल्या विद्यार्थ्यांना केले.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, प्रगतीची वाट शिक्षणातून जाते. भाजपाच्या कोकणातील सर्व नेत्यांना इथल्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटेवरील आर्थिक संघर्षाची कल्पना आहे. आपले नेते रविंद्र चव्हाण, नारायण राणे यांची आजची यशस्वी वाटचाल ही कधीकाळी अशाच संघर्षातून झालेली आहे. मी स्वत:देखील या परिस्थितीतून गेलो असल्याने रविंद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दप्तर वाटपाचा कार्यक्रम राबवत आहे असं मत युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित शिक्षक व पालकवर्गाने विशाल परब यांच्या या गरजेच्या उपक्रमाचे कौतुक केले. मोठे होऊन आमचे विद्यार्थीही आपल्या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिला. यावेळी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊळ, ॲड अनिल निरवडेकर, गाव प्रमुख मनोहर राउळ, बुथ अध्यक्ष सुनील राऊळ, प्रविण वेंगुर्लेकर, भास्कर राऊळ, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊळ,साई नाईक, ग्रा.प. सदस्या गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊळ, विनित राऊळ, मुख्याध्यापक विठ्ठल तुळसकर, शक्ती केंद्र प्रमुख गौरव मुळीक, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.