वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाला रुग्ण साहित्य - फळे वाटप

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: दिपेश परब
Published on: October 15, 2025 13:31 PM
views 33  views

वेंगुर्ले : भाजपाचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमीत्त उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे रुग्णालयास विविध अत्यावश्यक रुग्ण साहित्य तसेच उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला व पुरुष रुग्णांना फळेवाटप करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांत भाजपाचे प्रदेश सदस्य शरद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा सरचिटणीस साईप्रसाद नाईक, जिल्हासदस्य अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा सरचिटणीस वसंत तांडेल, वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. शुभंम धारगळकर, डॉ. स्वप्नाली माने-पवार, डॉ. अमोल गबाळे, साईप्रसाद नाईक जिल्हा उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर, महिला मोर्चा सरचिटणीस रसिका मठकर, महिला शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, सरचिटणीस प्रार्थना हळदणकर, अल्पसंख्यांक सेलच्या हसिनाबेग मकानदार, श्रेया मयेकर, आकांक्षा परब, परीचारीका पी. एफ. डिसोजा, युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रणव वायंगणकर, माजी शहर अध्यक्ष रविंद्र शिरसाट, माजी नगरसेवक अभिषेक वेंगुर्लेकर, हितेश धुरी, भुषण आंगचेकर, पुंडलिक हळदणकर, जयंत मोंडकर, सचिन शेट्ये, गौरव खानोलकर, कुणाल तारी, डॉ. गणेश गुट्टे, भगवान मुंडे आदींचा समावेश होता.