
वैभववाडी: आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी नगरपंचायत हद्दीतील दत्तमंदिर शाळा नं. १ व विद्या मंदिर वाभवे प्राथमिक शाळेतील १०९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. गेली ८ वर्षे श्री.रावराणे विविध उपक्रम राबवून आम.राणे यांचा वाढदिवस साजरा करतात.
आम.नितेश राणे यांचा वाढदिवस नुकताच झाला.हा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला.श्री.रावराणे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.यावेळी नगरसेवक सुभाष रावराणे , माजी नगरसेवक संताजी रावराणे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष श्रेया धावले, मुख्याध्यापिका दर्शना सावंत, उपशिक्षक दिनकर केळकर,मनीषा साठे, श्रीमती सरवणकर आदी शिक्षक उपस्थित होते.