मच्छिविक्रेत्या महिलांना मोठ्या छत्रीचे वाटप

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शिवसेनेचा उपक्रम
Edited by: दिपेश परब
Published on: August 30, 2023 14:30 PM
views 151  views

वेंगुर्ले :  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून  वेंगुर्ला बंदर येथील मच्छिविक्रेत्या महिलांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळच्या वेळी या महिला वेंगुर्ला बंदर येथे मासे विक्री करतात त्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने या छत्र्या देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, शिवसेना पदाधिकारी डॉ आर एम परब, मनाली परब, शबाना शेख, मच्छिमार नेते बाबी रेडकर, गणपत चोडणकर, राजू कुबल, राजन केळुस्कर, ऑगस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.