
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई मित्रांना धान्य वाटप करण्यात आलं. या कर्मचार्यांना हातभार द्यावा या उद्देशाने त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पुंडलिक दळवी यांची कन्या श्रीया दळवी हिच्या हस्ते करण्यात आले.
दोन महिन्याचे वेतन झालेलं नसल्याने सावंतवाडी नगरपालिकेच्या सफाई मित्रांनी अलिकडेच एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. मात्र, सावंतवाडी शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने नागरिकांना वेठीस न धरण्याच्या विनंतीला मान देऊन ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. आजही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून पुंडलिक दळवी यांनी सफाई मित्रांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जहूर खान, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, उद्योग व्यापार सेलचे तालुका उपाध्यक्ष याकूब शेख, धोंडी दळवी, बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस आदी उपस्थित होते.