
सावंतवाडी : आंबोलीचे माजी सरपंच कै.गजानन उर्फ बाळा पालेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. दुसऱ्या स्मृतीदिनी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सरपंच सावित्री पालेकर, सोसायटी चेअरमन शशीकांत गावडे, रामा गावडे, प्रकाश उर्फ बाळा गावडे, डॉ.अदिती पाटकर, डॉ.महेश जाधव, संतोष पालेकर,ग्रामपंचायत सदस्य सारिका गावडे, भाई गावडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद मोहिते, बालाजी ढोले,परिचारिका क्षमा पुराणिक, समृद्धी गवंडे तसेच रुग्ण उपस्थित होते.
यावेळी शशीकांत गावडे यांनी माजी सरपंच कै. बाळा पालेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच डॉ.जाधव यांनीही पालेकर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत आदरांजली अर्पण केली. यानंतर रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.