नितेश राणेंच्या हस्ते कणकवलीतील दिव्यांगांना मोफत इलेक्ट्रिक बाईकचे वाटप

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 07, 2023 19:12 PM
views 77  views

कणकवली : शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत दिव्यांग कल्याण निधी योजनेतून कणकवली नगरपंचायतच्यावतीने आमदार नितेश राणेंच्या हस्ते रुबाब बादशहा पटेल या दिव्यांग लाभार्थीला इलेक्ट्रिक दुचाकी प्रदान करण्यात आली.

यावेळी नगरपंचायत प्रशासक जगदीश कातकर, माजी नगराध्यक्ष समीर नलावडें, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभि मुसळे, बाबू गायकवाड, मेघा गांगण, महेश सावंत, अभय राणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा, राजा पाटकर, किशोर धुमाळे, तसेच नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की आमचे सरकार हे 365 दिवस जनकल्याणकारी योजना राबवणारे सरकार आहे. आज शासन आपल्या दारी उपक्रमातून रुबाब पटेल या लाभार्थी ला 1 लाख 29 हजार रुपये किंमतीची ई स्कुटी प्रदान करण्यात आली आहे. एकूण 77 लाभार्थी आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.