
खेड : कोकण रेल्वेच्या खवटी नातुनगर या रेल्वे ट्रॅक वर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली. खेड रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी हे काल १४ जुलै दुपारी ३ वाजल्या पासुन अडकुन पडले आहेत. रोटरी क्लब तर्फे खेड रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. त्यामुळे अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला.