न्हावेली शाळा नं १ इथं शैक्षणिक साहित्याचं वाटप !

Edited by: ब्युरो
Published on: July 02, 2024 07:33 AM
views 66  views

सावंतवाडी : श्री देवी माऊली युवक कला क्रिडा सेवामंडळ न्हावेलीचे सल्लागार तथा न्हावेली शाळा नं. १ चे माजी विद्यार्थी यांचे मार्फत जि.प पूर्ण प्राथ.शाळा न्हावेली नं. १ च्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी शिक्षणप्रेमी हरीष धाऊसकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्वेता माळकर, सदस्या सेजल धवण, लक्ष्मण परब, न्हावेली गावचे माजी सरपंच शरद धाऊसकर, माजी उपसरपंच विठोबा गावडे, माजी अध्यक्ष सचिन गावडे, प्रसाद शेगले. आनंद कोंडये, संपूर्ण शिक्षकवृंद व महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.