
देवगड : देवगड येथील सौंदाळेबाऊळवाडी येथील मुलांसाठी मुंबई येथील उद्योगपती विमल शहा आणि त्यांचे बंधू यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. हे साहित्य उपलब्ध होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोंडे व उपाध्यक्ष दीपक कामतेकर व सदस्य यांनी विशेष प्रयत्न केले.
सौंदाळे गावचे सुपुत्र राष्ट्रीय शरीर सौष्ठव पटू रविंद्र पेडणेकर यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे मुंबई येथील उद्योगपती विमल शहा आणि त्यांचे बंधू यांनी. इयत्ता पाचवी ते सातवीतील मुलांना प्रत्येकी चार वह्या व पॅड तर इयत्ता तिसरी ते चौथीतील मुलांसाठी प्रत्येकी तीन वह्या,पाण्याची बॉटल तर पहिली दुसरीतील मुलांसाठी प्रत्येकी दोन वह्या व पाण्याची बॉटल अशा साहित्याचे वितरण करण्यात आले. या शैक्षणिक साहित्याचे वितरण अरुण मोंडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंखे, उपशिक्षक दीपक डवर, तुषार औटी व संभाजी जाधव यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी उद्योगपती विमल शहा व रविंद्र पेडणेकर यांच्या साठी कृतज्ञता व्यक्त करून आभार व्यक्त केले. त्यांचा हा गेली तीन ते चार वर्षांन पासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे.