फोमेंतो कंपनीतर्फे रेडीतील प्राथमिक शाळेला संगणक, दुरदर्शन संचाचे वितरण

Edited by: दिपेश परब
Published on: June 30, 2023 19:47 PM
views 84  views

वेंगुर्ला : शिक्षण व सामाजिक विकासाला कायम प्रोत्साहन देणाऱ्या फोमेंतो कंपनीतर्फे रेडी येथील प्राथमिक शाळेला संगणक व दुरदर्शन संच वितरीत करण्यात आले. रेडी येथील म्हारताळेवाडी शाळा नं. १ मध्ये फोमेंतो कंपनी तर्फे रेडी येथील मिनरल्स अँड मेटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

बुधवारी हा कार्यक्रम विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रेडी खाणचे  व्यवस्थापक प्रमोद सरोदे, प्रदोष गावकर, मिनरल्स अँड मेटल्सचे महेश राणे, पुरुषोत्तम नायडू, विजय वाघमारे, श्री वनेद्रा, दुर्वा तेंडुलकर आदी उपस्थित होते. शाळेच्या वतीने या उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  


    यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांबळी यांनी स्वागतपर भाषण केले. त्या म्हणाल्या की,  शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाइन क्षेत्रामध्ये संगणक शिक्षणाची अत्यंत गरज आहे. तर आजच्या दैनंदिन जीवनात संगणक साक्षर असणेही तितकेच महत्वाचे आहे.  त्त्याच अनुषंगाने आम्ही  दोन महिन्यांपूर्वी विनंती केल्यानुसार संगणक आणि दूरदर्शन  संच तातडीने मंजूर करून वितरीत  केल्याबद्दल मिनरल्स व मेटल्स कंपनीचे आभार मानले. तर कंपनीकडून शाळेला सातत्याने सहकार्य होत असल्याबद्दल  कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख नारायण प्रसाद यांचेही त्यांचे विशेष आभार मानले. यावेळी मिनरल्स अँड मेटलचे खाणचे व्यवस्थापक प्रदोष गावकर यांनीहि बोलताना विद्यार्थ्यांसाठी संगणक ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होऊन भविष्यात संगणक विज्ञान क्षेत्रात  करिअर करावे. संगणक आणि विज्ञान क्षेत्राला भविष्यात मोठी संधी आहे असाहि संदेश खाण व्यवस्थापक प्रदोष गावकर यांनी दिला. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत राणे व दीपक राणे यांसह शाळेचे कर्मचारी सविता परब , सोनाली नाईक, सुधीर कांबळी, सोनिया पिंगुळकर आदी उपस्थित होते. महेश राणे यांनी आभार प्रदर्शन केले.