कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

Edited by:
Published on: January 12, 2025 17:30 PM
views 140  views

सावंतवाडी : येथील श्री साई इन्फोटेक या संस्थेत प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र किमान कौशल्य विकास कार्यक्रम महाराष्ट्र शासन अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते विद्यार्थांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे युवराज लखमराजे खेमसावंत भोसले, लेखक,दिग्दर्शक व उत्कृष्ठ अभिनेता म्हणून भूमिका पार पाडणारे देवेंद्र पेम, कौशल्य उद्योजकता सिंधुदुर्गच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख,  संगीता पेम, नामदेव सावंत, एकनाथ पाटील तसेच साई इन्फोटेक चे संस्थापक रघुनाथ तानावडे व डॉ. गौरी तानावडे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. श्री. साई इन्फोटेक ही संस्था 2000 साली स्थापन झाली असून या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

या संस्थेमधून 15 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. काही विद्यार्थी तर Microsoft, Oracle सारख्या नामांकित कंपन्यामध्ये देशात, परदेशात कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुनम नाईक यांनी केले. उपस्थित विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी येथे घेतलेल्या प्रशिक्षणाचा त्यांना सध्या कशाप्रकारे फायदा होत आहे हे सांगितले.“विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा भविष्यात योग्य तो उपयोग करून आपले भवितव्य उज्ज्वल बनवावे.” अस मार्गदर्शन युवराज लखमराजे भोसले यांनी केल. तसेच त्यांनी संस्थेस अमृतमहोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. संथेच्या 25 वर्षाच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल देवेंद्र पेम यांनी संस्थेचे कौतुक केले. सहाय्यक आयुक्त मा. इनुजा शेख यांनी विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या मोफत प्रशिक्षणाचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे सांगितले. आभार श्री साई इन्फोटेकचे रघुनाथ तानावडे यांनी मानले. आतापर्यंत मोफत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी बर्‍याच विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना लवकरच रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी संगितले.