
कणकवली : हरकुळखुर्द - रामकृष्ण पाताडे चॅरिटेबल ट्रस्ट, कापुरबावडी ठाणे प. यांच्या वतीने जिल्ह्यातील कणकवली हरकुळखुर्द येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व मुलांना तसेच भारत विद्यामंदिर लोरे नं १ ता.वैभववाडी या प्रशालेतही वह्या वाटप करण्यात आले.
हरकुळखुर्द -रामकृष्ण पाताडे चॅरिटेबल ट्रस्ट, कापुरबावडी ठाणे प. संस्थापक अध्यक्ष संदिप रामकृष्ण पाताडे, सचिव सौ.स्नेहा संदिप पाताडे, यांच्या माध्यमातून जेष्ठ समाजसेवक जयवंत देवजी रासम तसेच केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक संजय संभाजी रासम यांच्या पुढाकाराने हरकुळखुर्द येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व मुलांना वह्या वाटप करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्ग तसेच हायस्कूल प्रसारक मंडळ मुंबईचे सचिव ऍड. प्रभाकर वालावलकर, अनिल सावंत, सामाजिक कार्यकर्ते गजानन गायकवाड, अण्णा रासम, दीपक रामम, प्रसाद गायकवाड, ओमकार वाघमारे उपस्थित होते, त्याप्रसंगी मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी संदिप पाताडे, जयवंत रासम तसेच संजय रासम यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच भारत विद्यामंदिर लोरे नं१ ता.वैभववाडी या प्रशालेतही वह्या वाटप करण्यात आले, त्यावेळी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष रितेश सुतार, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी संदिप पाताडे यांंना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.