
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील पाल येथील सामाजिक कार्यकर्ते कमलेश गावडे तसेच मनिष दळवी मित्रमंडळ यांच्यावतीने गावातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, रमेश आमडोस्कर, ग्रा प सदस्य प्रदीप मुळीक, दिगंबर गावडे, संदीप नाईक, हरी गावडे यांच्यासाहित शाळेतील शिक्षिका उपस्थित होते.