
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मातोंड यांच्यावतीने गावातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ला खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, सोशल मिडीया सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य श्रीकृष्ण परब, शक्तिकेंद्र प्रमुख ताता मेस्त्री, सोसायटी संचालक पप्पू सावंत, वसंत खाजणेकर, रामदास रेडकर, शेखर परब, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काका सावंत, नंदा घाडी, भाजप कार्यकर्ते नारायण वैद्य, कांचन नाईक, विजय केळजी, प्रदीप जबडे, दिपक परब, प्रविण गुरव आदी उपस्थित होते.