
सावंतवाडी : भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावंतवाडी महिला मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांच वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवित त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी चिमुकल्यांनी प्रार्थना केली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आला. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, मेघना साळगावकर, अस्मिता भराडी, साक्षी गवस आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.