उसप इथं रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून वह्या वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: July 14, 2023 19:59 PM
views 70  views

दोडामार्ग : पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून शाळा उसप नं. 1 येथे नुकताच वहया वाटप कार्यक्रम संपन्न झाला.       यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष  एकनाथ नाडकर्णी, माजी जि.प. सदस्य चंदु मळीक, उसप सरपंच सौ. रुचिता प्रवीण गवस, भाजप दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुधीर दळवी, उसप केंद्रप्रमुख पावरा, मुख्याध्यापक अर्जून दळवी, शा. व्य. समिती अध्यक्ष शंकर नाईक,  ग्रामस्थ प्रवीण गवस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र देसाई यांनी केलं. आभार रामचंद्र घाडी यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी शालेय क्रिडा स्पर्धा, मुलाच्या सुप्त गुणांमध्ये वाढ होण्यासाठी शालेय स्पर्धा व विवीध उपक्रम राबवून त्याना प्रोत्साहित करावे. तसेच शाळेच्या भौतिक सुविधा प्राप्त करून देण्याबाबत उपस्थित मान्यवरांनी आश्वासन दिले.