गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 05, 2023 12:22 PM
views 79  views

देवगड : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जनसेवा हीच ईश्वरसेवा या उद्देश्याने आपण समाजाच देण लागतो व सेवा करण्याची संधी मिळते म्हणूनच देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक शाळेत लांब पल्ल्याच्या दुर्गम गावातील विद्यार्थींनीना ४/६ किलोमीटर अंतर कापून शाळेत पायी यावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन गणेशोत्सव निमित्त 'त्या' विद्यार्थीनींना भाजपा ओबीसी मोर्चा मुंबई तर्फे सायकलीचे वाटप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निमंत्रित सदस्य बाळा खडपे, भाजपा द .मुंबई उपाध्यक्ष - भा . ओ . मो. मुंबई सचिव विजय घरत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

त्याप्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते, भाजप पदाधिकारी महेश नारकर, पडेलचे सरपंच भुषण पोकळे, वाघिवरे / वेळगिवेचे सरपंच राजन लाड, उदय पाटील माजी उपसरपंच फणसगाव, कृष्णकांत आडिवरेकर माजी ग्रा. प. सदस्य फणसगाव, महेश पडवळ माजी ग्रा.पं.सदस्य, संतोष चव्हाण संस्था सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अरूधंती गोखले, उपस्थित शालेय विद्यार्थी, भाजप कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ, हा शालेय कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ज्यांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला त्यांचे विशेष आभार मानले गेले.