रोटरी क्लब ऑफ दोडामार्गमार्फत ग्रामीण रुग्णालयात बेबी कीटचे वाटप

Edited by: संदीप देसाई
Published on: August 08, 2023 19:33 PM
views 135  views

दोडामार्ग : रोटरी क्लब ऑफ दोडामार्ग मार्फत लहान नव्याने जन्म घेणाऱ्या मुलांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण बेबी किटचे वाटप ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग येथे करण्यात आले.

            अध्यक्ष दयानंद नाईक यांनी रोटरी क्लब अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. त्याची सुरवात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथून करण्यात आली. रोटरी क्लब दोडामार्ग मार्फत या किटचे वाटप करण्यात आले असून यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष दयानंद नाईक, सेक्रेटरी विठोबा पालेकर व राजेंद्र निंबाळकर, विशाल मणेरिकर, प्रवीण नाईक, विवेकानंद नाईक तसेच इतर रोटरीयन यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.