गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत 'आनंदाचा शिधा'चे वाटप

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 08, 2023 12:58 PM
views 193  views

कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत आनंदाचा शिधाचे वाटप माजी नगराध्यक्ष समीर नलावडें च्या हस्ते करण्यात आले सणासुदीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला सण असतो त्यासाठी आपल्या घरामध्ये गोड गोड अन्नपदार्थ बनवता यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आनंदाच्या शिधाचे वाटप संपूर्ण महाराष्ट्र सुरू आहे.

आज कणकवली कंझ्युमर्स सोसायटीच्या वतीने हे वाटप करण्यात आले. यावेळी कंझ्युमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडें, व्हाईस चेअरमन अण्णा कोदे महेश नार्वेकर, राजन परब, शैलेश डिचोलकर आदी उपस्थित होते.