
वेंगुर्ला : संपूर्ण देशासहित जगात गाजलेले तुफान विनोदी मालवणी नाटक वस्त्रहरण या नाटकाचा सध्या कोकण दौरा सुरू आहे. दरम्यान, रत्नागिरी व चिपळूण नंतर वेंगुर्ले येथे नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृह येथे ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात आलेला वस्त्रहरण नाटकाचा शो "हाऊसफुल्ल" च्या मार्गावर असल्याने नाट्यरसिकांच्या आग्रहास्तव ३० एप्रिल रोजीच सायंकाळी ६ वाजता "डिमांड शो" आयोजित करण्यात आला आहे. या शो ची तिकीट विक्री मातोश्री कला क्रीडा मंडळ शेजारी दाभोली नाका येथे सुरु असून अधिक माहितीसाठी तुषार साळगावकर (9067403981) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अयोजकांमार्फत करण्यात आले आहे.