५० हजारांच्या दंडात्मक कारवाईवर शेतकऱ्यांची नाराजी

Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2024 17:07 PM
views 360  views

सावंतवाडी : विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्यावतीने सावंतवाडी मतदार संघातील विविध गावातील शेतकऱ्यांना झाडतोड प्रकरणी रु.50 हजार दंड व आरोग्याची कोणतीही सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने मतदार ग्रामस्थांना जागृत करण्यास गावागावात सुरु करण्यात आली आहे. 

आरोस येथे झालेल्या बैठकीत दशरथ देऊलकर, शशिकांत नार्वेकर, विजय नाईक, बाबू सातार्डेकर, लक्ष्मण देऊलकर, संतोष हरमलकर, दिलीप परब, उत्तम मयेकर, देवेंद्र माणगांवकर, प्रसाद कांदे, आनंद नार्वेकर, तात्या गोडकर, विश्वंभर नाईक, दादा पांढरे, बाळा शिरोडकर, राजन  कर्पे, रामचंद्र मोरजकर, रामा मयेकर, सतीश बिरोडकर, बाबी कोकरे, संतोष पिंगुळकर, भावलो गावडे, अमित न्हावी, रामा मयेकर, बाळा माणगावकर, मनोज माणगावकर आदी उपस्थित होते.