सैनिक स्कूलच्या संचालकाला अटक व जामीन | मृत्यूमुखी पडलेल्या मुलींच्या पालकांनी केली तक्रार

Edited by:
Published on: December 10, 2023 19:59 PM
views 742  views

देवगड : देवगड येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या पिंपरी चिंचवड येथील सैनिक स्कूलची मुले आंघोळीसाठी गेली असता यातील पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.याप्रकरणी सैनिक स्कूलचे संचालक नितीन गंगाधर माने वय – 40 वर्षे, रा. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यापैकी संचालक असलेले नितीन गंगाधर माने यांना देवगड पोलिसांनी अटक केली व देवगड न्यायालयामध्ये हजर केले असताना त्यांची जामीनावर सुटका झाली आहे . माने यांचे वकील म्हणून एडवोकेट कौस्तुभ मराठे यांनी कामकाज पाहिले

बुडून मृत पावलेल्या अंकिता गालटे हिचे वडील राहुल पांडुरंग गालटे वय -46 वर्षे, मूळ रा. तेर, उस्मानाबाद (धाराशिव), सध्या रा. भीमशक्ती नगर, चिखली, ता. हवेली, पुणे यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदवली. सखाराम बापू तांबे वय -45 वर्षे, रा. पुणे  हे चालक असून यांच्यावरही देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा टॅक्स संदर्भात असून मोटर वेहिकल ऍक्ट संदर्भातला आहे.

माने यानी मुलांची सहल आयोजित करून त्यांनी त्या सहलीत आपले सोबत आपले नातेवाईक नेऊन तसेच मुलांना समुद्राचे ठिकाणी घेऊन लाईफ जॅकेट न देता, समुद्राच्या पाण्याची कोणतीही माहिती न घेता तसेच आरोपी क्र- 2 (चालक) याने वाहतूक करण्याची कोणतीही RTO परवानगी न घेता निष्काळजी पणामुळे व हयगयीच्या कृत्यामुळे फिर्यादी यांची मुलगी व इतर 03 मुली बुडून मयत झाल्या व त्यांच्या मृत्यूस वरील 2 आरोपी कारणीभूत झालेले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे पुढील तपास करत आहेत.