पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले तसेच ७ अधिकाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर

Edited by:
Published on: April 29, 2025 10:46 AM
views 80  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश प्रदीप रावले यांना पोलीस दलातील त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या एक मे रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. 

राजाच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी सोमवारी राज्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा आपल्या सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासाठी  समावेश केला. यात अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरविंद भिकाजी सावंत, दासू मुन्नू पवार, शिवाजी सुरबा सावंत, राजेंद्र गोविंद जामसंडेकर, लीलाधर गणपत राऊळ व पोलीस हवालदार सदानंद पांडू राणे व आरती अरविंद परब यांना महासंचालकांचे सन 2024 सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहे. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी खास अभिनंदन केले आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. 

सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी या सर्व सन्मानचिन्ह प्राप्त गुणवंत पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून, राज्याचे मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते महाराष्ट्र दिनाच्या १ मे ध्वजारोहण प्रसंगी या सर्वांचा सन्मान केला जाणार आहे.