सावंतवाडीत वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश सुरु

बी. लिब. प्रवेशही सुरु
Edited by: विनायक गांवस
Published on: July 23, 2024 12:37 PM
views 146  views

सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणिजनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करता करता हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा  वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा बारावी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा शालान्त परीक्षा दहावी किंवा पूर्वीची अकरावी उत्तीर्ण अधिक दोन वर्षांचा कोणताही शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. नियमित शुल्कासह १५ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येईल.

बी. लिब. प्रवेश प्रक्रिया सुरु  

बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आणि मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या अभ्यासक्रमासाठीही २०२३-२४ प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु आहे. बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स- बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स उत्तीर्ण अशी पात्रता आहे.

 या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी, केंद्र संयोजक राजेश मोंडकर ९४२३३०१७३१ आणि बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आणि मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स : महेंद्र पटेल ९४०३५५९८११ यांच्याशी संपर्क साधावा.