
सावंतवाडी : चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडीत बैठक झाली. यात सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सरकते जिने, पन्नास वुडन काॅटेजीस आणि जलजीवन योजनेतून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकावर पन्नास उडन कॉटेजीस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत आराखडा सादर करण्याचे निर्देश दिल्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच रेल्वे स्थानकावर जलजीवन मधून पाणी योजना मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच अधिकारी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले ,चांदा ते बांदा या योजना आणि सिंधू रत्न योजनेच्या कामांचा आढावा घेतला. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म कव्हर करून सरकते जिने बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला तसेच रेल्वे स्टेशनवर पन्नास वुडन कॉटेजेस उभारण्यात येणार आहेत .रेल हॉटेल बांधण्यास रेल्वेच्या काही तांत्रिक बाबी असल्याने अडथळा निर्माण होत असल्यामुळे वुडन काॅटेजीस आराखडा तयार केला जात आहे असे त्यांनी सांगितले.सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस वर जलजीवन योजनेतून पाणी योजना मंजूर झाली आहे. या ठिकाणी रेल्वे पाणी भरणे किंवा अन्य कामांचा उपयोग करता येईल. पारपोली ते आंबोली दरम्यान पायवाट विकसित करणे तिलारी येथे पर्यटन प्रकल्प, आंबोली येथे गोल्फ कोर्स, तिलारी येथे लेक रिसॉर्ट असे विविध प्रकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.