सावंतवाडीत 'डायमंड ज्वेलरी उत्सवा'चा अर्चना घारेंच्या हस्ते शुभारंभ

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सला शुभेच्छा
Edited by: विनायक गावस
Published on: October 20, 2023 11:47 AM
views 208  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या वतीने २१ वा डायमंड ज्वेलरी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या डायमंड ज्वेलरी उत्सवाचा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब हस्ते शुभारंभ करण्यात आला. डॉ. आनंद पेडणेकर, श्री. आबा पेडणेकर यांच्या नेतृत्वात दर्जेदार उत्पादने, उत्तम सेवा यांच्या बळावर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. हीच यशस्वी वाटचाल अखंडपणे सुरू रहावी अशा शुभेच्छा यावेळी घारे यांनी दिल्या.  यावेळी शाखा व्यवस्थापक अजित खैरे, दिलीप वैद्य, संयोगिता उगवेकर, आबा पाटकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.