दोडामार्गमध्ये MNGL ठेकेदारांचं धुमशान | सरपंच, ग्रामस्थांचं 'बांधकाम'समोर धरणं !

ठेकेदारांना पाठीशी घालतेय बांधकाम खातं ! | आंदोलनकर्त्यांचा आरोप !
Edited by: संदीप देसाई
Published on: November 07, 2022 18:59 PM
views 142  views

दोडामार्ग : पावसाळा ओसरताच पुन्हा एकदा दोडामार्ग तालुक्यात MNGL  कंपनीच्या पाईपालाईन ठेकेदारांनी डोके वर काढले असून गेल्यावर्षी नव्याने बनवीलेले रस्ते उखडून साईडपट्टीवर नियम बाह्य खोदकाम करून पाईप लाईनचे काम सुरू केले आहे. दरम्यान या कामाला आई व वझरेतील ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शविला असून सार्वजनिक बांधकाम खाते या ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर जनतेच्या रहदारीच्या रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या या बेजबाबदार ठेकेदारांना आवर घालण्यासाठी दोडामार्ग मधील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर आई गावच्या सरपंच साजू नाईक व वझरे गावचे सरपंच लक्ष्मण गवस यांनी ग्रामस्थांसह धरणे आंदोलन सुरू केले आहे.


दोडामार्ग वासीयांसाठी एमएनजीएल कंपांनीच्या गॅस पाइप लाईनचे काम मोठी डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम खात्याने दिलेली अरवंगी नियम, आटी शर्ती बासनात गुंडाळून या कंपनीचे ठेकेदार आपल काम उरकून घेण्यात धडपड करत आहेत. आणि त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा तितकाच दुर्लक्ष करत आहेत. दोडामार्ग आयी मार्गावर याचे काम सुरू आहे.  ठेकेदाराचा निष्काळजीपणा लोकांच्या जीवितास कधीही धोकादायक ठरू शकतो, आधीच खड्ड्यात गेलेला हा काही रस्ता नवीन करूनही नियमबाह्य खोदाईमुळे पुन्हा एकदा अपघातास आमंत्रण देत आहे.  त्यामुळे आयी पंचक्रोशीतील लोक पुढे सरसावले असून हे काम रोखण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.


या आंदोलनात आयी सरपंचा साजु नाईक, वझरे सरपंच लक्ष्मण गवस, बबलू पांगम, कृष्णा पर्येंकर, विठ्ठल माटणेकर, अमोल पर्येंकर, प्रमोद हरवाळकर, सतीश गवस, प्रज्योत पर्येंकर, विनोद बेळेकर, अविनाश शिरोडकर, तुषार नाईक, विवेक एकावडे, राजेश गवस, सागर गवस, वैभव शिरोडकर, भदी गवस, वासुदेव पर्येंकर, वासुदेव पर्येंकर, सुष्टीश नाईक, झिलु गवस, संत्रिश नाईक आदी सहभागी झाले होते.