
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षणसेवक म्हणून सामावून घ्यावे या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर डीएड पदविका धारक बेरोजगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत आमचा विचार केला जात नाही. आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही असा निर्धार या बेरोजगारांनी केला आहे.