शिवजयंतीनिमित्त देवगडात भव्य शोभायात्रा !

सकल मराठा समाजाचं आयोजन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 20, 2024 10:03 AM
views 60  views

देवगड : 'जय भवानी…. जय शिवाजी'च्या जयघोषात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणां देत देवगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन संदीप साटम व केदार सावंत व हर्षदा सावंत या उभयतांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ध्वजारोहण सोहळा सुंदर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.

या नंतर भव्य शोभायात्रा शुभारंभ देवगड सडा ते देवगड बाजारपेठ ते देवगड किल्ला या मार्गावर सजविलेल्या रथातून छत्रपती शिवराय यांचा पेहराव करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

यावेळी संदीप साटम, अविनाश सावंत, दयानंद पाटील योगेश राणे, किसन सूर्यवंशी, राजू पाटील, मिलिंद माने, नंदू देसाई, शरद ठुकरुल, तुषार पाळेकर, सदानंद सावंत, संजीव राऊत, राजू भुजबळ, शामराव पाटील, अमित कदम, सूर्यकांत पाळेकर, बंटी कदम, ऋतिक धुरी, चंद्रहास मर्गज, सुदाम मोरे, शेखर गोळवणकर, संजय तारकर, शंकर पाटील, तन्वी शिंदे, नंदिनी कोयघाडी, शीतल जोईल व अन्य शिवप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या वेळी देवगड तालुका मराठा समाजाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन देवगड मराठा समाजाचे अध्यक्ष संदीप साटम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.