
सावंतवाडी : शिवसेना प्रभाग क्रमांक ६ चे उमेदवार दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी उमेदवार शर्वरी धारगळकर उपस्थित होत्या. श्री. सुर्याजी यांनी यावेळी विजयाचा विश्वास केला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा केला. यावेळी महेश देऊलकर, सत्यवान बांदेकर, समता सुर्याजी, सावित्री बांदेकर, निकिता सुर्याजी, मेहर पडते, प्रथमेश प्रभू, अनिकेत पाटणकर, गणेश कुडव, सौ. शिरवलकर, श्री. वेंगुर्लेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











