सीटी स्‍कॅन सेवा सुरू करण्‍यासाठी देव्या सूर्याजी, राजू मसूरकर यांचे प्रयत्‍न

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन तपासणीची विनामूल्य सेवा, एका वर्षात 9000 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतली सेवा हि बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली.
Edited by: विनायक गावस
Published on: June 14, 2025 21:38 PM
views 237  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन तपासणीची विनामूल्य सेवा, एका वर्षात 9000 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतली सेवा हि बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली. मात्र बातमीच्या दुसऱ्या दिवशीच सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याची बातमी आली होती.याचे कारण सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रातील सी.टी. स्कॅन डिपार्टमेंटचे बिल थकीत होते. त्याकरिता सदर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती असे सांगण्यात आले. ही सेवा पुन्हा सुरु व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, रुग्ण कल्याण नियामक मंडळाचे आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी,जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. याची दखल घेत आता सरकारने योग्य तोडगा काढून सदर सेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आज शनिवार पासून ही सेवा रुग्णांसाठी पुन्हा एकदा विनामूल्य सुरु झाली आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड, जिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. श्रीपाद पाटील, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. ऐवळे व सी.टी. स्कॅन तपासणी 24 तास सेवा देणारा स्टाफ यांचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्याकडून आभार मानण्यात आले.