देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथे दिनांक १५ आणि १६ जानेवारी २०२५ रोजी दीक्षित फाऊंडेशन पुरस्कृत भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कै.नीता निळकंठ दीक्षित स्मरणार्थ आणि सौ. मंजिरी निरंजन दीक्षित यांच्या सौजन्याने ही स्पर्धा श्री. दत्त मंगल कार्यालय, वाडा येथे संपन्न झाली. बाल गट, कुमार गट आणि खुला गट या तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. या सुगम संगीत स्पर्धेचे हे दुसरे वर्ष. उदयोन्मुख गायकांना प्रोत्साहन देणे आणि व्यासपीठ मिळवून देणे हा दीक्षित फाऊंडेशनचा ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश आहे.
बाल गटात कु. उन्नती गणेश गोडे (प्रथम), आरोह संदीप पेंडूरकर (द्वितीय), कु. मंत्र नितीन कोळंबकर(तृतीय) आणि वेद नारायण चव्हाण(उत्तेजनार्थ) यांनी यश प्राप्त केले. कुमार गटात कु. तनुश्री मराठे (प्रथम), कु. प्रांजली कानेटकर( द्वितीय), कु. स्वरा अभिजीत यादव( तृतीय) आणि कौस्तुभ हर्षद जोशी( उत्तेजनार्थ) यांनी सुयश संपादन केले. खुल्या गटात शौरीन संजीव देसाई (प्रथम), संस्कृती हर्षद जोशी(द्वितीय), वैष्णवी चव्हाण(तृतीय), आणि जयेश तेंडुलकर, वैष्णवी कोपरकर, उत्तरा केळकर, सृष्टी तांबे, आसावरी निगुडकर, प्रकाश कांबळी याना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
उद्घाटन समारंभाला सौ. मंजिरी निरंजन दीक्षित, श्री. निरंजन दीक्षित, श्री. मदन माधव सोमण, स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य सौ. प्रियांका वेलणकर, श्री. हर्षद जोशी, श्री. संदीप फडके, राधिका काणे, मानसी करंदीकर, श्री. विश्वास वेलणकर, श्री. राजेंद्र पाटणकर, सौ. ऋतुजा पाटणकर आणि स्पर्धेचे परीक्षक डॉ. शीतल धर्माधिकारी, श्री. निळकंठ गोखले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षद जोशी यांनी तर सूत्रसंचालन राधिका काणे आणि मानसी करंदीकर यांनी केले. संदीप फडके आणि श्री. हर्षद जोशी यांनी हार्मोनियम तर अभिनव जोशी, सौरभ वेलणकर, गौरव पाटणकर यांनी ताल विभाग सांभाळला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुमारे १०० स्पर्धक सहभागी झाले.
बक्षीस वितरण समारंभाला सौ. मंजिरी दीक्षित, श्री. मदन सोमण, श्री. निरंजन दीक्षित, मा. आमदार श्री. अजितराव गोगटे, श्री. महेश मराठे आणि स्पर्धा आयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक, आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.