
देवगड : देवगड जामसंडेयेथील श्रीराम मोरेश्वर गोगटे विद्यामंदिरचे १७ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक भवन जामसंडे येथे संपन्न होणार आहे. यानिमित्त विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी ९ वा.विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ, प्रमुख पाहुण्यांचेमार्गदर्शन,तसेच. विद्यार्थी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी,संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे,असे आवाहन विद्या विकास मंडळ जामसंडे संचलित श्री राम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यामंदिर जामसंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.










