देवगड - जामसंडेतील पाणीप्रश्न सोडविण्यात आ. नितेश राणे यांना यश...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 12, 2023 11:37 AM
views 256  views

देवगड : देवगड तालुक्यातील व विजयदुर्ग नळ पाणी योजनेतील समाविष्ठ गावांना तसेच देवगड-जामसंडे शहरातील नगरपंचायत हद्दीतील नळ ग्राहकांना 'शिरगाव पाडाघर' या योजनेवरून देवगड जामसंडे शहराबरोबर अन्य ९ गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा येत्या दोन दिवसात सुरळीत करण्यात येणार असून,हा खंडित पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली करण्यात आमदार नितेश राणे यांना यश आले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना दिली. देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील नळ ग्राहकांना गेले ४ ते ५ महिने अनियमित खंडित प्रसंगी ७ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा करण्यात येत होता. या भागातील जनतेला शिरगाव पाडागर येथून नळ योजनेद्वारे तसेच दहिबाव अन्नपूर्णा नदीवरील नळ पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा होत असे,परंतु या योजनेचे सुमारे ७५ लाख रुपये विज बिल थकल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने हा वीज पुरवठा खंडित केला होता.

गेली चार महिने शिरगाव पाडागर येथील पाणी योजनेवरून देवगड शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला होता. त्यामुळे दहिबाव येथील अन्नपूर्णा नदीवरून होणारा पाणीपुरवठा अनियमित व अपुऱ्या प्रमाणात होत होता. त्याचबरोबर शिरगाव पाडागर या योजनेतील अन्य न९ गावांचा ही पाणीपुरवठा विद्युत पुरवठा खंडित केल्याने बंद झाला होता.

या संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत विजयदुर्ग व शिरगाव पाडागर नळपाणी योजने संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन,महाराष्ट्र राज विद्युत कंपनीचे अधिकारी, त्याचबरोबर स्थानिक सरपंच, ग्रामसेवक ,गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा व जीवन प्राधिकांचे अधिकारी यांच्या समवेत घेण्यात आली होती .गणेशोत्सव काळात आवश्यक असलेला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे या अनुषंगाने आ.नितेश राणे यांनी संबंधित अधिकारी वर्गाची तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याशी चर्चा करून या यावर आवश्यक तो तोडगा काढला व खंडित केलेला वीज पुरवठा महाराष्ट्र वीज वितरण कंपनी द्वारे सुरळीत करण्यात आला असून या पुढील काळात शिरगाव नळ पाणी योजनेच्या तांत्रिक अडचणी दूर करून देवगड जामसंडे शहराबरोबर अन्य ९ गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हा कार्यकारी निमंत्रित आरिफ बगदादी ,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, देवगड जामसंडे नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल शिरगाव उपसरपंच संतोष फाटक, पडेल सरपंच भूषण पोकळे ,उत्तम बिरजे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.