भाजपा युवा नेते विशाल परब उद्यापासून दोडामार्गच्या प्रचार दौऱ्यावर

Edited by: लवू परब
Published on: February 02, 2026 18:40 PM
views 37  views

दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजचे युवा नेते विशाल परब मंगळवार पासून दोडामार्ग प्रचार फेरीत सक्रिय होणार आहे. यामुळे तालुक्यातील सर्व उमेदवार, पदाधिकारी,  कार्यकर्त्यांमध्ये  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे जवळपास २५ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. अन्य ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी कोकणचे नेते खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या नेत्यांनी प्रचार यंत्रणेची कमान सांभाळली आहे. सावंतवाडी मतदार संघातले लोकप्रिय युथ आयकॉन असलेले भाजपाचे युवा नेते विशाल परब हे सक्रिय झाल्याने महायुतीचे उमेदवार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साहाचं वातावरण पसरले आहे.

महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी विशाल परब हे उद्या दोडामार्गमध्ये प्रचारकार्यक्रम राबवणार आहेत. यापूर्वी दोडामार्गमध्ये अपक्ष उमेदवारी भरलेल्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची समजून काढून त्यांना आपले अर्ज मागे घ्यायला लावण्यात विशालभाईंनी निर्णायक भूमिका बजावली होती. आता दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागी आणि पंचायत समितीच्या ५ जागी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या कोलझर पंचायत समिती उमेदवाराच्या यशात विशाल परब यांच्या शिष्टाईचे योगदान मोठे  असल्याच कार्यकर्त्यांचं म्हणण आहे.