
देवगड : कर्नाटका येथील मलपी नौकेवर देवगड सागरी हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत नौका जप्त करण्यात आली असून, त्यातील मासळीचा लिलाव झाला आहे.देवगड येथील परप्रांतीय नौकांवरील ही चौथी मोठी कारवाई आहे. व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही दहावी मोठी कारवाई आहे. देवगड परवाना अधिकारी तथा अंमलबजावणी अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने ही यशस्वी मोहीम राबवली असून. सागरी हद्दीत अंदाजे १६ ते १८ वावा (फॅदम) खोलीवर ही नौका मासेमारी करत असल्याचे आढळले.पथकाची नौका जवळ येताच संशयित नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र, सतर्क पथकाने वेगवान पाठलाग करत मोठ्या शिताफीने या नौकेला पकडले.
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला चाप लावण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने पुन्हा एकदा आपली कंबर कसली असून आपली सजगता यावेळी सिद्ध केली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम १९८१ आणि सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत ही कारवाई दिनांक २१ जानेवारी २०२६ च्या रात्री सुमारे १० वाजता नौकेचे नाव हनुमा वैभवा नावाच्या नौकेवर करण्यात आली
या नौकेचा नोंदणी क्रमांकIND-KA-02-MM-५८१९ असून मालकाचे नाव श्रीमती नयना एन. कुंडेर,आहे व राहणार वड़ाभांडेश्वर, मलप्पी, जिल्हा उडपी, कर्नाटक या नौकेची परवाना वैधता केवळ कर्नाटक राज्याच्या जलक्षेत्रासाठी आहे.; महाराष्ट्र हद्दीत कोणताही वैध परवाना नव्हता परंतु गस्ती दरम्यान देवगड समोरील सागरी क्षेत्रात ट्रॉलिंग पद्धतीने अवैध मासेमारी करताना या कर्नाटक राज्यातील नौकेवर यावेळी ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
“ही कारवाई आमच्या विभागाच्या सततच्या सजगतेचे फलित आहे. परप्रांतीय नौकांकडून होणारी अवैध मासेमारी स्थानिक मच्छीमारांच्या हितांना धक्का पोहोचवते आणि सागरी जैवविविधतेचेही नुकसान करते,” असे किरण. वाघमारे यांनी यावेळी सांगितले.या नौकेवर तांडेलसह एकूण सात खलाशी उपस्थित होते. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, नौका देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. नौकेवर सापडलेली मासळी लिलाव प्रक्रियेत असून, त्यातून मिळणारी रक्कम शासकीय खजिन्यात जमा होईल. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग . सागर कुवेसकर यांच्याकडे सादर करण्यात येईल. सुनावणीनंतर नौकामालक आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्या दिशानिर्देशानुसार विभागाने अवैध परप्रांतीय मासेमारीविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत
यापूर्वीच्या कारवायांमध्येही विभागाने अनेक नौका जप्त केल्या असून, त्यातून मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.मत्स्यव्यवसाय विभागाच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक मच्छीमार समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईत किरण वाघमारे यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक आणि रक्षक .संतोष ठुकरुल, धाकोजी. खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, नेसवंणकर आणि सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम फत्ते झाली .










