
देवगड : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक देवगड मध्ये दाखल झाले आहेत.देवगड तालुक्यातील सर्वच पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.तसेच हॉटेल व्यवसाय देखील तेजीत आहे, सर्व हॉटेल्स हाऊसफुल झाले आहेत, येथील खाद्यसंस्कृती मासे तसेच स्वच्छ सुंदर समुद्र किनारे तसेच बोटिंगला पर्यटकांची पसंती पाहायला मिळते. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला येथे किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि बोटिंगचा आनंद पर्यटक लुटत आहेत.
देवगड किल्यावर लाईट हाऊस, वॅक्स म्युझियम, पवनचक्की येथील जीप लाईन आणि गार्डन येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर, वाडा येथील श्री विमलेश्वर ,मिठबाव येथील रामेश्वर आणि गजबादेवी मंदिर,पोखरबाव गणेश मंदिर ,पाडगाव दत्त मंदिर तसेच देवगड विजयदुर्ग मुणगे मिठबाव तांबळडेग मिठमुंबरी आदी समुद्रकिनारी देखील पर्यटक भेट देत आहेत, तिर्लोट - -आंबेरी, तारामुंबरी - मिठमुंबरी, हिंदळे - मिठबांव या पुलावरून पर्यटक सेल्फी घेत आहेत. देवगड तालुक्यातील पर्यटन स्थळांना मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असल्याने पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे.










