
देवगड : देवगड तालुक्यातील तारामुंबरी रोड पासुन वार्ड नं. 12 हा रस्ता काही वर्षापूर्वी अर्धवट काम करुन सोडून देण्यात आला होता. याबाबत स्थानिक ग्रामस्थ 2019 पासून वारंवार देवगड जामसंडे नगरपंचायत यांच्याकडे पञ व्यवहार करत होते. मात्र, नगरपंचायत काहीच दखल घेत नव्हती. याबाबत ग्रामस्थांनी मनसे महिला शहर अध्यक्षा ममता धुरत यांना संपर्क करुन पाठपुरावा करावा,अशी मागणी केली होती. याबाबत आज मनसे शिष्ट मंडळ व ग्रामस्थ यांनी देवगड जामसंडे,नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याबाबत लवकरात लवकर पाठपुरावा करावा, असे सांगण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, महिला शहर अध्यक्षा ममता धुरत, मनविसे शहर अध्यक्ष अभिजीत तेली, शहर अध्यक्ष सचिन राणे, ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.










