शेठ मफतलाल गगलभाई हायस्कुलच्या विदयाभवन वास्तूचं आज उदघाट्न

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 30, 2025 11:37 AM
views 25  views

देवगड : देवगड येथील शेठ मफतलाल गगलभाई हायस्कुल देवगड येथे संस्थेने बांधलेल्या ‘मातोश्री सुंदरा शंकर वळंजू विदयाभवन वास्तूचे उदघाट्न आणि नामफलक अनावरण सोहळा आज मंगळवार दि. 30 डिसेंबर 2025 रोजी दु. 2 ते 4 या वेळेत संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष के. एन. बोरफळकर, कार्याध्यक्ष अरुण जोशी, मुख्याध्यापक प्रविण खडपकर यांनी केले आहे.