
देवगड : देवगड इथं ३० व ३१ रोजी 'जल्लोष'चा कार्यक्रम देवगड बीच वर होणार असून यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अमीर हडकर यांच्या 'मुझिकल शो' च खास आकर्षण असणार आहे. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित व राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून देवगड बीच येथे ३० व ३१ डिसेंबर रोजी 'जल्लोष' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सलग दोन दिवस चालणाऱ्या या बीच फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध गायिका अबोली गिडे, अनुष्का शिकतोडे, गायक मुन्नावर अली, आदिश तैलंग यांच्यासह महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अमीर हडकर यांना 'मुझिकल शो' विशेष आकर्षण असणार आहे. 'जल्लोष' महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.दरवर्षीप्रमाणे मोठ्या दिमाखात जल्लोष साजरा करण्यासाठी तसेच येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोय सुविधा मिळाव्यात यासाठी आयोजकांकडून चांगले नियोजन करण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत, नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 'जल्लोष' महोत्सवाची देवगडवासीय आतुरतेने वाट पाहत असतात.दरवर्षी हा महोत्सव अधिक दिमाखदार होण्यासाठी आयोजकांचे प्रयत्न यावर्षीही असणार आहे.३० व ३१ डिसेंबर रोजी जल्लोष महोत्सवांतर्गत दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध सेलिब्रिटी गायकांच्या सुमधुर गाण्यांनी 'जल्लोष' महोत्सव अधिक बहरणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन ३० रोजी रात्री ८ वा. मान्यवरांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध गायिका अबोली गिडे व गायक मुन्नावर अली यांच्यासह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अमीर हडकर यांचा म्युझिकल-शो रंगणार आहे. ३१ रोजी रात्री ८ वा. प्रसिद्ध गायिका अनुष्का शिकतोडे, गायक आदिश तेलंग यांची संगीत मैफिल रंगणार आहे. मध्यरात्री १२ वा. जल्लोषपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. रात्री १२.३० वा. खास प्रेक्षकांसाठी डी. जे. नाईटस् हा विशेष कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवांतर्गत फूड स्टॉल, लहान मुलांसाठी विविध गेम्स आदी मनोरंजनाचे कार्यक्रम देखील असणार आहेत.










