
देवगड : सिंधुदूर्ग जिल्हामध्ये एकाच वेळी महास्वच्छता अभियानाचे आयोजन मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले या अभियानाचा शुभारंभ मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते पडेल येथे दिपप्रज्वलन व संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून झाले.
यावेळी गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण , सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील ,पडेल सरपंच भुषण पोकळे , उपसरपंच विश्वानाथ पडेलकर,माजी सरपंच दीक्षित व मुळम,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , कृषी अधिकारी दिगंबर खराडे , विस्तार अधिकारी ग्रा.प दिपक तेंडुलकर , विस्तार अधिकारी शिक्षण श्रीरंग काळे , तंटामुक्ती अध्यक्ष सुनील बोडस,व सर्व ग्राम पंचायत सदस्य,जिल्हा कार्यक्रम समन्वयक ( पाणी व स्वच्छता विभाग ) संतोष पाटील , जिल्हा तज्ञ मार्गदर्शक प्रविण कानकेकर , संदीप पवार , नंदु माहुरे, पर्यवेक्षिका प्रियांका लाड तसेच , ग्राम पंचायत कर्मचारी , बचतगट महिला प्रतिनिधी , शिक्षक , विदयार्थी , अंगणवाडी सेविका , आशा व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पडेल येथील शाळा , हायस्कुल , प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटी देत मार्गदर्शन केले . लोकसहभागातुन महास्वच्छता अभियानाला मिळालेला प्रतिसाद कौतुकास्पद असुन पडेल गावाच्या नियोजनाचे कौतुक केले . या अभियान निमित्त पडेल हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक व अधिकारी , कर्मचारी यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधले तसेच यावेळी स्वच्छता अभियानही राबवण्यात आली. या महास्वच्छता मोहिमे अंतर्गत देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात , परीसर स्वच्छता व कार्यालयातील कागदपत्रांचे वर्गीकरण करणे , अधिकारी व कर्मचारी यांची टेबल व कपाटे नीटनेटके करणे , फलक लावणे , रंगरंगोटी करणे अशी कामे तसेच शाळांमध्ये वर्गखोल्या आणि परीसराची साफसफाई करणे तसेच आरोग्य केंद्रामध्ये परीसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले .










