महात्मा गांधी विद्यामंदिरचा १६ डिसेंबरला वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 14, 2025 12:09 PM
views 174  views

देवगड : तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संस्था अध्यक्ष संदीप तेली यांच्या अध्यक्षतेखाली, प्रमुख पाहुणे म्हणून देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत १६ डिसेंबर रोजी होणार आहे. यानिमित्त विविध कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात रात्री ८.३० वा.विविध गुणदर्शनाचा मनोरंजन कार्यक्रम  सादर करण्यात येणार आहे.

यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन व  पारितोषिक वितरण समारंभ, प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन,तसेच. विद्यार्थी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना संस्था पदाधिकारी, संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.