
देवगड : तळेबाजार – वरेरी येथील अनुराधा बाळकृष्ण पारकर (७२) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अनुराधा बाळकृष्ण पारकर यांचा स्वभाव मनमिळाऊ होता तसेच नेहमी हसतमुख असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी वरेरी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरअंत्यसंस्कार करण्यात आले. तळेबाजार बाजारपेठमधील अनिकेत फोटो स्टुडिओचे मालक व छायाचित्रकार अनिकेत पारकर यांच्या त्या मातोश्री होत.










