
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाची साक्षी शिदृकचे नेत्र दीपक यश.महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दिल्ली येथे होणाऱ्या "नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र" उपक्रमात महाराष्ट्र राज्यातून एकूण 11 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात कोकण विभागातून साक्षी शिदृकची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य उच्चतंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या "करिअर कट्टा" उपक्रमांतर्गत "नजरेसमोर राष्ट्र हृदयात महाराष्ट्र " या विशेष महाराष्ट्र उपक्रमाची सुरुवात डिसेंबर 2024 मध्ये करण्यात आली. या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांविषयी प्रेरणा, मार्गदर्शन, आणि प्रत्यक्ष अनुभव देण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी आणि विविध शासकीय कार्यालयांना या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, सर्व पदाधिकारी व संचालक , महाविद्यालयाचे चेअरमन संभाजी साटम, मानद अधीक्षक सुधीर साटम, प्राचार्य समीर तारी,अकॅडेमीक को ऑडीनेटर प्रा. सिद्धी कदम, महाविद्यालयीन करिअर कट्टा समन्वयक प्रा.अक्षता मोंडकर यांनी अभिनंदन केले आहे.










