
देवगड : देवगड पंचायत समिती इथं संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या मूल्यांना समर्पित असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिनगारे, अधिक्षक कुणाल मांजरेकर आदी मान्यवर व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभात तालुका समन्वयक सिमा बोडेकर यांनी संविधानाचे महत्त्व आणि भारतीय लोकशाहीतील त्याची भूमिका यावर प्रकाश टाकला. "संविधान हे देशाच्या सर्व नागरिकांना समान अधिकार आणि स्वतंत्रता देणारे आहे. प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क आणि कर्तव्य समजून त्यानुसार वागणे गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात पंचायत समितीच्या कर्मचार्यांनी 'संविधान शपथ' घेतली, ज्यात ते संविधानाचे पालन आणि त्याच्या तत्त्वांचे समर्थन करण्याची शपथ घेतली. तसेच पंचायत समिती देवगडच्या आवारात स्वच्छता अभियान मोहिम राबवण्यात आली. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व आभार प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी मानले.










