श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत संविधान जनजागृती रॅली

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 26, 2025 13:56 PM
views 77  views

देवगड :  २६ नोव्हेंबर या  ऐतिहासिक संविधान दिनाचे औचित्य साधून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत संविधान जनजागृती रॅली - मानवी साखळी याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, जेष्ठ शिक्षक संजय पांचाळ, कार्यक्रम प्रमुख. विनायक जाधव, मंगेश गिरकर, मोहन सनगाळे, समीरा राऊत, राधिका वालकर, मानसी मुणगेकर आदी मान्यवर व प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून संविधानाची प्रस्तावना सामूहिकरित्या वाचली. विद्यार्थ्यांना संविधानाचा इतिहास, त्यातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि मूल्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने संविधान जनजागृती मोहिमेअंतर्गत जनजागृती रॅली , व मानवी साखळी हा प्रशालेने सादर केलेला अभिनव उपक्रम लक्षवेधी ठरला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे मुख्याध्यापक. सुनील जाधव यांनी भूषविले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन, अधिकारांचे भान व कर्तव्यांचे पालन याबाबत प्रेरणादायी संदेश दिला. संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नाही, तर आपल्या नागरिकत्वाचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. विद्यार्थ्यांनी अधिकारांइतकेच कर्तव्यांचेही भान ठेवले, तर राष्ट्राची प्रगती वेगाने घडते. लोकशाही मजबूत करण्याची सुरुवात शाळेतून होते; संविधानाचे संस्कार प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकारणे अत्यावश्यक आहे. संविधान दिन हा स्मरणाचा दिवस नाही, तर संविधानानुसार जगण्याचा नवा संकल्प करण्याचा दिवस आहे.” असे प्रतिपादन केले. समृद्धी गुरव व चिन्मयी भुजबळ या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रस्ताविका व भाषण केले.कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम प्रमुख .विनायक जाधव यांनी उत्तम प्रकारे केले.