
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाची उत्साही सुरुवात संस्थाध्यक्ष माजी आमदार अॅड.अजित गोगटे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी सचिव - प्रवीण जोग, क्रीडा समिती अध्यक्ष प्रशांत वारीक, मुख्याध्यापक सुनील जाधव, ज्येष्ठ शिक्षक संजय पांचाळ, क्रीडा शिक्षक पराग हिरनाईक, मृत्युंजय मुणगेकर, मोहन सनगाळे, मंगेश गिरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अजित गोगटे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे खेळण्याचा आणि “खेळातून एकता, शिस्त आणि आरोग्य” यांचे मोल जपण्याचा संदेश दिला.
या क्रीडा महोत्सवात धावणे, लांब उडी, गोळाफेक, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आदी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि स्पर्धात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. या महोत्सवाचा समारोप विजेत्यांना बक्षीस वितरण करून करण्यात येणार असून “खेळाडू वृत्ती आणि संघभावना हीच खरी विजयी शक्ती आहे” असा संदेश देत पहिल्या दिवसाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक .मोहन सनगाळे यांनी केले.










