असं आहे देवगड जि. प. मतदारसंघासाठी सदस्य पदाचं आरक्षण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 13, 2025 15:02 PM
views 277  views

देवगड : देवगड तहसिल कार्यालयात जिल्हा परिषद मतदार संघ सदस्य पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी पार पडली जि.प.गटात महिला आरक्षण पडल्याने येथून इच्छुक असलेल्या पुरूष उमेदवारांचा पुरता हिरमोड झाला आहे.देवगड पंचायत समितीच्या १४ गणांची आरक्षण सोडत प्रक्रिया निवडणुक उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसलिदार आर.जे.पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर उपस्थित होते.आरक्षण सोडत प्रक्रियेची रूपरेषा उपजिल्हाधिकारी  शेवाळे यांनी सांगीतली यानंतर देवगड पंचायत समिती कार्यक्षेत्रातील लोकसंख्येनुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे तहसिलदार पवार यांनी सांगीतले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल,मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, जयेश नर, अमित साटम, योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, पंकज दुखंडे, दिलीप कदम आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


जि. प. गटाचे आरक्षण 

१ पुरळ- सर्वसाधारण

२ पडेल- सर्वसाधारण महिला

३ बापर्डे- सर्वसाधारण महिला

४ शिरगाव- अनु.जाती(सर्वसाधारण)

५ किंजवडे- सर्वसाधारण महिला

६ कुणकेश्वर- नागरिकांचा मागास प्रवर्ग

७.पोंभुर्ले - ना.मा.प्र महिला प्रवर्ग